वेगाने कोसळतीय भारतीय अर्थव्यवस्था - स्वामी
केंद्रीय अर्थसंकल्प सादर व्हायला काही दिवसांचाच अवधी बाकी असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प सादर व्हायला काही दिवसांचाच अवधी बाकी असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. वर्ल्ड बॅंकेने केलल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतूक केले आहे. मात्र, वर्ल्ड बॅंकेच्या आकड्यांवर आपला विश्वास नाही. वास्तव पाहिले असता भारतीय अर्थव्यवस्था घसरत चालली आहे, असे मत स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच सुरू होत असून, त्यात सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. मात्र, त्यापूर्वी केंद्र सरकारसाठी वर्ल्ड बॅंकेकडून एक गुड न्यूज आली आहे. वर्ल्ड बॅंकेने सन २०१८मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के राहिल अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. आर्थिक विकास दराच्या बाबतीत भारत चीनलाही पाठीमागे टाकेल, असेही वर्ल्ड बॅंकेने म्हटले आहे. दरम्यान, सुब्रमण्याम स्वामी यांनी थेट वर्ल्ड बॅंकेच्या आकेडवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महत्त्वाचे असे की, वर्ल्ड बॅंकेने आपल्या रॅंकिग रिपोर्टमध्ये भारत सरकारच्या NPA ला निपटण्याच्या धोरणाचे कौतूक केले आहे. प्राप्त माहितीनुसार, इन्सॉल्वेंसी आणि बॅंकरप्सी कोडच्या माध्यमातून बॅंकांना कर्जवापसी सिस्टममध्ये आणण्यासाठी सरकार मोठे काम करत आहे.
वर्ल्ड बॅंकेच्या रॅंकींग कॅटेगरी रिजॉल्विंग इन्सॉल्वेंसीमध्ये भारताची स्थिती १३६ च्या पायरीवरून सुधारून ती १०३वर पोहोचली आहे. मात्र, सुब्रमण्याम स्वामी यांचे म्हणने असे की, हे आकडे केवळ दाखविण्यासाठी आहेत. परत्यक्षात मात्र, वास्तवता काही वेगळीच आहे.