बंगळुरु : दिवाळीच्या आधीच कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएससाठी आनंदाची बातमी आली आहे. कर्नाटक पोटनिवडणुकीत पाच पैकी 2-2 जागेवर काँग्रेस-जेडीएस आघाडीला यश मिळालं आहे. तर भाजपला फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- बेल्लारी लोकसभा सीटवर काँग्रेसने भाजपला 2 लाख 24 हजार मतांनी पराभूत केलं आहे.


- मांड्या लोकसभा सीटवर जेडीएसने भाजला 2 लाख 50 हजार मतांनी पराभूत केलं आहे.


- शिमोगा सीटवर भाजप उमेदवाराने जेडीएसच्या उमेदवाराला 47 हजार मतांना पराभूत केलं.


- रामनगर विधानसभा सीटवर जेडीएसने भाजपला 1 लाख 9 हजार मतांनी पराभूत केलं.


- जामखंडी विधानसभा सीटवर काँग्रेसने भाजपला 39 हजार 480 मतांना पराभूत केलं.


कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं की, '2019 निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत राज्यातील सर्व जागा जिंकू. कुमारस्वामी यांच्या मते, भाजप जेडीएस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना खरेदी करण्यासाठी 25-30 कोटींची ऑफर करत होती. पण ते कोणालाच पक्षातून तोडू शकले नाही.'


कर्नाटक निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची होते. भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसने देखील या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली होती.