नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता भाजपने 2019 साठी नवी रणनीती आखली आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपने यूपी, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नुकसान होऊ नये म्हणून रणनीती आखली आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपला या राज्यातून जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 साठी भाजपची नजर दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांवर देखील आहे. येथे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये दक्षिण-पूर्व भागातील 122 जागांवर लक्ष केंद्रीत करुन अनेक रॅली येथे करणार आहेत. भाजपचं पुढचं लक्ष्य केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम आणि पूर्वेकडील राज्यांवर आहे. लोकसभा निवडणुकीत इतर काही राज्यांतील जागा जरी कमी झाली तरी त्याची भरपाई या राज्यांतून करण्याचा भाजपचा विचार आहे.


भाजप अध्यक्ष अमित शाहा यांनी 2019 साठी काम सुरु केलं आहे. 3 राज्यात जरी भाजपला पराभवाचा धक्का बसला असला तरी नव्या रणनीतीने कामाला सुरुवात केली पाहिजे. लोकांचा अजूनही पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. असं पक्षाचं म्हणणं आहे. पीएम मोदी 2019 च्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा 2013-14 प्रमाणे आक्रमक होतील. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी काही जागांवर रॅली करणार आहेत. ज्या ठिकाणी भाजपने कधीच विजय मिळवलेला नाही.


दक्षिण भारत, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मोदी रॅली करणार आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील 2 ठिकाणी ते रॅली करणार आहेत. केरळमध्ये 17 ते 18 ठिकाणी, तमिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 40 ते 42 ठिकाणी ते रॅली करणार आहेत. या राज्यांमध्ये काँग्रेस कमजोर आहे. येथे भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपशासित राज्यांमध्ये जास्तीत जास्त योजना आणल्या जाणार आहेत.