नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची आज बैठक होते आहे. हिमाचलमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.


आमदारांची बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशाच्या आमदारांसोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊ शकतो. शनीवार निवडणुकीत पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेले प्रेम कुमार धूमल यांनी स्वत:ला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याने म्हटलं आहे.


कोण होणार मुख्यमंत्री?


पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जयराम ठाकुर आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा हे मुख्यमंत्र्यांच्या पदांच्या शर्यतीत असल्याचं म्हटलं जातंय. हिमाचल प्रदेशचे नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत न झाल्याने दोन्ही केंद्रीय पर्यवेक्षक केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करण्यासाठी शिमला येथून दिल्लीला आले होते.


मुख्यमंत्रीपदासाठी सहमती नाही


केंद्रीय मंत्री नर्मला सीतारमण आणि नरेंद्र सिंह तोमर यांना यासाठी शिमला येथे पाठवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ठाकुर मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात पुढे होते. पण बदलत्या राजकीय वातावरणानुसार नड्डा यांना अधिक पंसती मिळू शकते. धूमल यांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ते या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.