नवी दिल्ली : आनंदाच्या क्षणी काही वेळा चुकीचे शब्द तोंडून निघून जातात... पण, ते पंतप्रधानांबाबत असतील तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच काहीसं घडलंय ते राजस्थान सरकारचे श्रम आणि नियोजन मंत्री डॉ. जसवंत यादव यांच्या बाबतीत... गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर जसवंत सिंह यांनी चुकून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'जगातील सर्वात भ्रष्ट पंतप्रधान' असा केलाय. 



जगातील सर्वात 'बेस्ट' पंतप्रधान असं म्हणता म्हणता जसवंत सिंह यांच्या तोंडून 'भ्रष्ट पंतप्रधान' असा शब्द निघून गेला... आणि मग काय थोड्या वेळातच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला पाहायला मिळाला.