विधानसभेत आमदाराचा तीन पत्ती खेळतानाचा VIDEO आला समोर
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना आमदार खेळत होता टॅब्लेटवर गेम, विधानसभेतला VIDEO पाहिलात का तुम्ही?
महोबा : विधानसभेत आमदार (MLA) त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडत असतात.या प्रश्नांवर सत्तेतील मंत्री उत्तर देत असतात. प्रत्येक मतदारसंघातील आमदार अशाप्रकारची भूमिका विधानसभेत (Legislative Assembly) बजावत असतो. मात्र असे असताना एक आमदार विधानसभेत गेम (teen patti game) खेळतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हि़डिओ पाहून सामान्य नागरीक आमदारावर सडकून टीका करतायत.
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरु असताना भाजप आमदार (Bjp Mla) राकेश गोस्वामी टॅब्लेटवर तीन पत्ती खेळतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भातला व्हि़डिओ समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) मीडिया सेलने ट्विट करत भाजपवर निषाणा साधला आहे.
“महोबा मतदारसंघातील भाजप आमदार विधानसभेत तीन पत्ती (teen patti game) खेळत आहेत, तर कर्नाटकात भाजपचे आमदार मोबाईलवर पॉर्न पाहताना आढळले आहेत ? या दोन घटनेचा उल्लेख करत समाजवादी पार्टीने भाजपला चांगलेच घेरले.“भाजप आमदारांना सार्वजनिक समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. ते फक्त भ्रष्टाचार, बलात्कार आणि फालतू खेळण्यात गुंतले असल्याची सडकून टीका समाजवादी पार्टीने केली. हे भाजपचे लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी आहेत का? लाजिरवाणे! असे ट्वि्ट करत समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) भाजपचा खरपूस समाचार घेतला.
सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) मीडिया सेलने 24 सप्टेंबर रोजी ट्विटवर हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओवर सर्वसामान्य नागरीक भाजप आमदारावर टीका करत आहे. एका युझरने लिहिले, "कोणी आमदाराला निलंबित करेल का?, तर दुसऱ्या युझरने हे लज्जास्पद कृत्य असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या युझरने “भाजप आमदार घरात बसून मोबाईलवर पत्ते खेळत आहेत का? महत्त्वाच्या ठिकाणी अशी कृत्ये होत असतील, तर महागाई, बेरोजगारी, उपासमारीच्या समस्या कोण ऐकणार?, अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली.
उत्तरप्रदेशच्या विधानसभेत (Uttar pradesh Assembly) ही घटना घडली आहे. दरम्यान याआधी देखील अनेक विधानसभेत अशा घटना घडल्या आहे. काही विधानसभेत आमदार पॉर्न व्हिडिओ आणि फोटो पाहतानाचे व्हिडिओ समोर आले होते. या घटनेनंतर मोबाईल बंदीचा निर्णय अनेक विधानसभेत घेण्यात आला होता.