कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एकचं खळबळ माजली जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या आमदार चंदना बौरी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. भाजप आमदार चंदना बौरी यांच्या सुरक्षेसाठी एक्स सुरक्षा प्रदान करण्यात आली असता त्या बेपत्ता झाल्या कशा असा प्रश्न उपस्थित राहत आहे. पण सहा तासांनंतर एक दिलासादायक बातमी समोर आली. बौरी जवळच्या पोलीस स्थानकात सुरक्षित आहेत. गुरुवारी पहाटे साल्टोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार चंदना बौरी अचानक बेपत्ता झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बौरी बेपत्ता झाल्याची माहिती यांच्या पतीने सीआयएसएफ कमांडोंना पहाटे 2:45 वाजता दिली. बौरी यांना केंद्रीय सुरक्षा कवच अंतर्गत एक्स श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती आणि हे कमांडोत्यांच्या सुरक्षेसाठी होते. बौरी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताचं सर्वत्र शोधकार्य सुरू झाले. त्यानंतर  अवघ्या सहा तासांत त्या  जवळच्या पोलीस स्थानकात असल्याची माहिती मिळाली. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेपत्ता आमदाराची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. सर्वप्रथम बौरी यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी कमांडोंना पोलीस स्थानकात असल्याची माहिती दिली. पतीसोबत वाद झाल्यानंतर पोसील स्थानकात आल्याची माहिती त्यांनी दिली. 


बौरी यांना केंद्रीय सुरक्षा कवच अंतर्गत एक्स श्रेणी सुरक्षा देण्यात आली आहे. 'एक्स' श्रेणीतील केंद्रीय व्हीआयपी सुरक्षा संरक्षणाअंतर्गत किमान दोन सशस्त्र कमांडो त्याच्या निवासस्थानी चोवीस तास उपस्थित असतात. केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदारांना निवडणुकीनंतर संभाव्य धोका लक्षात घेता ही सुरक्षा प्रदान केली होती.