बलिया : अल्पवयीन मुली, तरूणी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांनी देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. भाजप आमदाराने मात्र या घटनांवरून अत्यंत वाचाळपणे विधान केले आहे. अल्पवयीन मुली खुले आम फिरतात. मोबाईल वापरतात. त्यांनी खुलेआम फिरू नये. तसेच, मुलींनी मोबाईलही वापरू नये. खुलेआम फिरने आणि मोबाईलचा अतिवापर यामुळेच बलात्काराच्या घटना घडत असल्याचे धक्कादायक विधान भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. ते बालिया मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करतात.


समाजातील विकृतींना पालक जबाबदार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेंद्र सिंह महोदयांचे म्हणने असे की, स्मार्टफोनच्या अतिरेकामुळे मुली बिघडच चालल्या आहेत. मोबाईलचा वापर केल्यामुळे त्यांना चुकीच्या सवयी लागतात. त्या मुक्तपणे फिरतात. त्यामुळे बलात्कारासारख्या घटना घडतात. इतकेच नव्हे तर, समाजात जन्माला आलेल्या विविध विकृतींना पालक जबाबदार आहेत. अल्पवयीन मुलांचे ते योग्य पद्धतीने संरक्षण करत नाहीत, असेही सुरेंद्र सिंह म्हणतात.


वादग्रस्त वक्तव्यांची सुरेंद्र सिंहला सवय


सुरेंद्र सिंह यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करून वाद निर्माण केला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली खटला दाखल झालेला भाजप आमदार कुलदिपसिंह सेंगर याच्या बचावार्थही सिंह याने असेच विधान केले होते. त्या वेळी सिंह यांने म्हटले होते की, ३ ते ४ मुलांची आई असलेल्या महिलेवर कोणत्याही व्यक्तिने बलात्कार करणे शक्यच नाही. त्या वेळीही मोठा वाद निर्माण झाला होता.