व्हिडिओ : भाजपा नगरसेवकाची पोलीस आणि वकील महिलेला जबर मारहाण
ज्या नगरसेवकाने मारहाण केली तो वॉर्ड क्र.40 चा नगरसेवक आहे.
मेरठ : उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील कंकरखेडा येथील हायवेर असलेल्या ब्लॅक पेपर रेस्टॉरंटमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. या ठिकाणी एका भाजपाचा नगरसेवक पोलीस सब इन्स्पेक्टरला मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोयं. पोलिसाची महिला वकील मैत्रिणीने यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरुन हॉटेल मालक आणि भाजपा नगरसेवकावर तक्रार दाखल करण्यात आलीयं. तसेच ऑन ड्यूटी निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसालाही तंबी देण्यात आली आहे.
जबर मारहाण
शुक्रवारी पोलीस सब इन्स्पेक्टर सुखपाल आपल्या वकील असलेल्या मैत्रिणीला घेऊन हॉटेलमध्ये गेला असताना ही घटना घडली.
पोलीसाची वकील मैत्रिणही नशेमध्ये होती. यावेळी त्याची काही कारणावरून हॉटेल मालकासोबत बाचाबाची झाली.
हॉटेल मालकाने स्थानिक नगरसेवक मनीष पवारला या बाचाबाचीबद्दल सांगितलं आणि हॉटेलमध्ये बोलावलं.
घटनास्थळी आलेल्या नगरसेवक मनीषने पोलिसाशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि त्याला जबर मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी पोलिसाची वकील मैत्रिण मध्यस्थी करत होती. पण त्या नगरसेवकाने तिलाही मारहाण केली.
ज्या नगरसेवकाने मारहाण केली तो मेरठमधील वॉर्ड क्र.40 चा नगरसेवक आहे.