जयपूर : जयपूरमध्ये भाजप कार्यालयातच पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत बैठकीत भाजपा खासदाराला हार्टअटॅक आला. राजस्थानातील जाट नेते, जलसंपदा राज्यमंत्री सांवरलाल जाट यांना शनिवारी हृदयविकाराचा धक्का आला. यानंतर ते बेशुद्ध पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावरलाल जाट बेशुद्ध पडले, त्यावेळी अमित शाह, मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. भाजपच्या आमदार-खासदारांसोबत पक्षश्रेष्ठींची बैठक सुरु होती.


हार्ट अटॅक आल्यानंतर जाट यांना तात्काळ ग्रीन कॉरिडॉर करुन सवाई मानसिंग रुग्णालायत दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर आहे. मात्र ते लवकरच बरे होतील, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.


सांवरलाल जाट  अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच आता अजमेरमधून भाजपचे खासदार आहेत. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ या काळात ते मोदी सरकारमध्ये जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते.