मुंबई : मोहनललागंजमधून भारतीय जनता पार्टीचे खासदार कौशल किशोर (BJP MP Kaushal Kishor) यांच्या कुटुंबातील अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौशल किशोर यांच्या सुनेने (Kaushal Kishor daughter in law Ankita try to Suicide) घराबाहेर येऊन आपल्या हाताची नस कापली असून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. खासदारांच्या सुनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती आपण जीव देणार असल्याचं म्हणतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप खासदार कौशल किशोर यांची सून अंकिता (BJP MP Kaushal Kishor Daughter in Law Ankita)  ही घराबाहेर आली आणि तिने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अगोदरही अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिने सुसाइड नोट लिहिली होती. आपला नवरा आयुषवर तिने गंभीर आरोप केले होते. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 


अंकिताने या व्हिडिओत म्हटलं आहे की,'मी आत्महत्या करायला जात आहे. ज्यानंतर ती खासदार कौशल किशोर यांच्या घरी स्कूटीने पोहोचली. आणि तिने आपल्या हाताची नस कापली. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर आता उपचार सुरू आहे.'


पुढे ती म्हणाली की, 'मी कुणालाच घाबरत नाही. तुझे वडिल खासदार आणि आई आमदार आहे. माझं कुणीच ऐकणार नाही. मी आजपर्यंत तुम्हाला कुणालाच हात लावू दिला नाही. तू इतकं खोटं बोलत आहेस. तू आणि तुझ्या घरातल्यांनी माझं जगणं हैराण केलं आहे.'


अंकिताने केली आयुषच्या नार्को टेस्टची मागणी 


या अगोदर अंकिताने आपला नवरा आयुष आणि त्याच्या कुटुंबियांच्या नार्को टेस्टी मागणी केली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली होती. तसेच आयुष किशोरच्या पत्नीने अंकिताने आपला उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. 


आयुषने अंकितावर लावले गंभीर आरोप 


भाजप खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष फरार आहे. आयुषने एक व्हिडिओ जारी करून पत्नीवर गंभीर आरोप लावले आहे. या व्हिडिओ स्वतःची सफाई देताना त्याने अंकिताने आपल्याला फसवल्याचं म्हटलं आहे. तो सरेंडर करेल त्याने कोणतंच चुकीचं काम केलं नाही.