नवी दिल्ली: खासदाराच्या आत्महत्येनं राजधानी दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी इथल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार राम स्वरुप शर्मा यांनी आयुष्य संपवलं आहे. त्यांनी घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम स्वरूप शर्मा भाजपचे खासदार होते. दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राम स्वरूप शर्मा राहत होते. सकाळी 7 वाजता पोलिसांना फोन आला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. 


भाजप खासदार राम स्वरूप शर्मा यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. या प्रकऱणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवर शोक व्यक्त केला आहे. 




राम स्वरूप शर्मा यांच्या निधनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला. 'हिमाचल प्रदेशातील मंडीचे भाजप खासदार राम स्वरूप शर्मा यांच्या आकस्मिक निधनाने फार दु: ख होत आहे. मी शर्मा यांच्या कुटुंबियांसोबत आहे. दिवंगत रामस्वरुप शर्मा यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना' असं ट्वीट करून अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केलं.


खासदार राम स्वरूप शर्मा यांच्या अचानक जाण्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर हिमाचल प्रदेशातील त्यांची पोकळी न भरून निघणारी आहे. भाजन नेत्यांनी रामस्वरुप शर्मा यांच्याप्रती शोक व्यक्त केला आहे.