मुंबई : भारतातील चांगल्या कॉलेजमधून डिग्री घेऊन विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंद करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.  रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार असून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार यांची मुलगी श्रेयशी निशंकने परदेशातील लाखो रुपयांच्या नोकरी बाजूला सारून भारतीय सैन्यात सहभागी होऊन राष्ट्रसेवा करण्याचा निर्णय घेताल आहे. डॉक्टर श्रेयशी निशंक शनिवारी अधिकृतरित्या कॅप्टन आर्मी मेडिकल कोरमध्ये रुजू झाली आहे. श्रेयशी आता रुडकीयेथील सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहे. 



सैन्याच्या हॉस्पिटलमधील कार्यक्रमात वडिल रमेश पोखरियाल यांनी मुलगी श्रेयशीला स्टार लावून कॅप्टनच्या रुपात सन्मान केला. हा फोटो पोखरियाल यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केली. सोबतच लिहिलं की, मी खूप आनंदी आहे की माझी मुलगी डॉ श्रेयशी निशंकने उत्तराखण्डच्या सैन्याची परपंरा सुरू ठेवत. ऑर्मीमध्ये डॉक्टर पदावर रुजू झाली आहे. 


आता खासदार आणि त्यांच्या मुलीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. खासदाराच्या मुलीचे हे कतृत्व सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे.