नवी दिल्ली : गिनीज वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या आयडीबीआय बॅकंचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. याच बॅंकेचे २ हजार कोटी रूपयांचे कर्ज विजय माल्याने बुडवले आहेत. तसेच एनपीए २२ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे खाजगीकरणाचा घाट घातला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान खाजगीकरण करू नये यासाठी भाजप खासदार सुनील गायकवाड आणि आयडीबीआय एससी एसटी असोसिएशनच्या उपाध्यक्ष विजया ढवळे यांनी केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांची भेट घेतली. या बँकेतले ८० टक्के कर्मचारी हे तरुण आहेत. आयडीबीआयमध्ये दुसरी बँक मर्ज करावी, अशी मागणी खासदार सुनील गायकवाड यांनी केली आहे.