बंगळुरु : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या १५ जागांसाठी गुरुवारी पोटनिवडणूक होणार आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. तर ९ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. हा निकाल राज्यातील सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या निकालावरुनच कर्नाटकमधील भाजप सरकार पडणार की राहणार याचा निर्णय होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अठानी, कगवाड, गोकक, येलापूर, हिरेकेरूर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापूर, के.आर. पुरा, यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआउट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.


भाजपला ८ जागा जिंकणं आवश्यक


महाराष्ट्रातील सत्ता गमवल्यानंतर आता भाजपपुढे कर्नाटक सरकार टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. राज्यातील १५ जागांचा निकाल सर्वकाही ठरवणार आहे. भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी ८ जागा जिंकाव्याच लागणार आहेत. जर भाजपला ८ जागा जिंकता आल्या नाही तर मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा सरकार पडणार आहे.


भाजपने या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस सोडून भाजपमध्ये आलेल्या आमदारांनाच उमेदवारी दिली होती. ज्यांनी या आमदारांना मतदान केलं ते आणि भाजपने आधी तिकीट दिलेले उमेदवार नाराज असल्याने भाजपला धक्का बसू शकतो. काँग्रेसमधून ११ तर जेडीएसमधून ३ आमदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. १३ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने या आमदारांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. विधानसभा अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांनी २५ आणि २८ जुलैला या आमदारांचं सदस्यत्व अयोग्य असल्याचं घोषित केलं होतं.


१५ विधानसभेच्या जागांसाठी १६५ उमेदवार रिंगणात आहे. ज्यामध्ये १२६ अपक्ष उमेदवार आहेत. तर ९ महिला उमेदवार आहेत. भाजप आणि काँग्रेस सर्व जागा लढवत आहेत. तर जेडीएस १२ जागांवर रिंगणात आहेत. या १२ जागांवर त्रिशंकू लढत आहे.