नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे 4 दिवस सत्ता संघर्ष रंगला. त्यानंतर भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सर्वात जास्त जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. कर्नाटक नंतर भाजप आता अशा राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत करण्याचा विचार करते आहे जेथे त्यांना जास्त अपेक्षा आहे. तेलंगणा हे भाजपचं पुढचं राज्य असेल जेथे त्यांना जास्त अपेक्षा आहेत. कारण येथे चंद्रबाबू नायडू यांचा टीडीपी आणि वायएसआर काँग्रेससाठी खूप कमी जागा आहेत. हे पक्ष नेहमी वेगळ्या तेलंगणाच्या विरोधात होते. अशातच या दोन्ही पक्षांसाठी येथे संधी कमी आहे. तेलंगणा भाजपसाठी पुढचं टार्गेट असेल. 2019 मध्ये राज्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक एकत्रच घेतल्या जाणार आहेत.


अमित शाहांचं विशेष लक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणामधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांनी म्हटलं की, 'काही दिवसांपूर्वीच दिल्लीत अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात एक बैठक झाली. त्यांनी तेलंगणावर जोर दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार होत्या त्या झाल्या आहे. आता तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशावर लक्ष केंद्रीत करा.' त्यांनी म्हटलं की, राजकीय स्थिती आणि निवडणुकीची योजना यासाठी अमित शाह तेलंगणामध्ये येण्याची शक्यता आहे.


भाजप बनवणार रणनीती


लक्ष्मण यांनी म्हटलं की, राज्याच भाजप संगठना म्हणून मजबूत आहे. राज्यात स्वत:ला आणखी मजबूत करण्यासाठी मतदान केंद्रांवर एक वेगळी प्रणाली वापरली जाईल. भाजपने अनेक राज्यांमध्ये ही प्रणाली वापरली आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ता आपल्या विभागात येणाऱ्या कुटुंबाला वैयक्तीक जाऊन भेटतो. राज्यात पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी पक्ष काम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.