महाराष्ट्रात भाजपची स्वबळाची तयारी? 2029च्या विधानसभेसाठी नवं मिशन!
BJP Mission 2029: भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय.
BJP Mission 2029: 2029 विधानसभा भाजप स्वबळावर लढणार आहे.. त्यासाठी आतापासूनच भाजपनं तयारी सुरू केलीय.. त्यासाठी नव्या वर्षात भाजपनं नवं मिशन हाती घेतलंय. त्यासाठी केवळ 15 दिवसात दीड कोटी जनतेला भाजपशी जोडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं.. काय आहे भाजपचं मिशन 2029 पाहुयात.
महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केलीय.... 2029च्या विधानसभेसाठी भाजपनं नवं मिशन हाती घेतलंय... नव्या वर्षात म्हणजे 2025 साली भाजप संघटन पर्वाची सुरुवात करणार आहे.. त्यासाठी दीड कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट ठरवण्यात आलंय...भाजपच्या प्रत्येक संघटनेला सदस्य नोंदणीसाठीच उद्दिष्ट देण्यात आलंय.. 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत दीड कोटी लोकं भाजपशी जोडले जाणार आहे..
भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय. 1 जानेवारी ते 15 जानेवारी या काळात भाजपचं नवं अभियान असेल. 2029ला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. दीड कोटी लोकांना सदस्य करण्याचं उद्दिष्ट्य भाजपने डोळ्यासमोर ठेवलं आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीचं टार्गेट देण्यात आलं आहे.
महिला मोर्चावर सदस्य नोंदणीची जबाबदारी
रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप संघटन पर्वाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलीय. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामालाही सुरूवात केलीय.. 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अमित शाहांनी 2029 साली भाजप स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.
त्या दिशेनंच भाजपनं नव्या अभियानातून एक पाऊल पुढे टाकलंय... भाजप स्वबळावर लढणार मग शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय होणार याची चर्चा सुरु झालीये.