नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अयोध्येत मंदिर बांधण्यावर, झी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ZEE NEWS न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांच्याशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. झी न्यूजवर अमित शाह यांनी ही एक्‍सक्‍लुझिव्ह मुलाखत दिली आहे. 'आपण राम मंदिरसाठी फक्त एक वीटच नाही ठेवू इच्छीत, तर संपूर्ण मंदिर बनवू इच्छितो', असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. अयोध्येत मंदिर बांधण्यावर अध्यादेश आणण्याशी संबंधित मुद्यावर, सुधीर चौधरी यांनी जो प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना अमित शाह यांनी हे उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे, 'राम मंदिरसाठी एक वीट नाही, तर संपूर्ण मंदिर बनवायचं आहे, न्यायालय या मुद्यावर विचार करीत आहे, या प्रकरणात घाई करणे योग्य ठरणार नाही. आम्ही जनतेच्या भावनांना देखील समजतो आणि त्यांना उत्तरं देखील देत आहोत'.


या प्रकरणात अध्यादेश आणण्याच्या आवश्यकतेवर बोलताना अमित शाह म्हणाले, की कोर्ट या प्रकरणात सुनावणी करणार आहे, जानेवारीत ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे यावर घाई घाईने काही बोलता येणार नसल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.