नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी भाजपच्या नेत्याने एक पाऊल उचललं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई आणि पत्नीला गळाभेट किंवा हस्तांदोलनही करता आले नाही. तसेच भेटीआधी मंगळसूत्र काढून द्यावे लागले, बूट आणि कपडेही बदलून भेटावे लागले होते. इतकचं नाही तर त्यांच्या भेटीदरम्यान काचेची भिंतच उभी करुन अडथळा निर्माण करण्यात आला होता.


पाकिस्तानकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे दिल्लीतील भाजप नेत्याने एक पाऊल उचललं आहे. 


दिल्लीतील भाजप नेते आणि प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पाकिस्तानसाठी चक्क स्लिपर बुक केल्याची ऑर्डर अॅमेझॉनवर दिली. तसेच पाकिस्तानात बुक केलेली ही चप्पल पाकिस्तानात पोहचावी यासाठी पाकिस्ताना उच्चायोगाचा पत्ताही दिला.


बग्गा यांनी ट्विट करत म्हटलं की, "पाकिस्तानला आपली चप्पल हवी आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आयुक्तालयासाठी मी या चपला ऑर्डर करत आहे".



बग्गा यांनी एक ऑनलाईन मोहिम सुरु केली असून पाकिस्तानला चप्पल पाठविण्याचं आवाहन केलं आहे.


बग्गा यांनी दावा केलाय की, माझ्याकडून चप्पल पाठविल्यानंतर काही वेळातच शंभराहून अधिक नागरिकांनी पाकिस्तान उच्चायोगाला चप्पल पाठविल्या आहेत.