भाजपचे दिल्लीतील मुख्यालय नव्या जागेवर हलवणार
भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतील ११ अशोक रोड येथील मुख्यालय आता दीन दयाल उपाध्याय मार्गावर जाणार आहे.
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतील ११ अशोक रोड येथील मुख्यालय आता दीन दयाल उपाध्याय मार्गावर जाणार आहे. नवे मुख्यालयाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
दीन दयाल उपाध्याय मार्गावर भाजपचे हे नवीन कार्यालय बांधले. ८ हजार स्क्वेअर फूटमध्ये पाच मजल्यांचे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर मुख्यालय स्वागत कक्ष. दुसरा आणि तिसरा मजला सरचिटणीस व पदाधिकारी यांच्यासाठी असेल. पाचवा मजला राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांचे कर्मचारीसाठी आरक्षित असेल.
चौथ्या मजल्यावर काय?
चौथ्या मजल्यावर माजी अध्यक्षांसाठी २ खोल्या आणि अत्याधुनिक ग्रंथालय असेल. तिथे जगभरातील विज्ञान आणि इतिहासाची पुस्तके असतील. २७० गाड्या पार्क करण्याची व्यवस्था असेल. सीसीटीव्ही कॅमरे लावले आहेत. केवळ राष्ट्रीय अध्यक्ष वगळता सर्व पदाधिका-यांची केबिन पारदर्शक ठेवली आहे. ७ लिफ्ट बनवल्या आहेत. त्यातील एक लिफ्ट राष्ट्रीय अध्यक्षांसाठी असेल. याच मार्गावर आरजेडी आणि आम आदमी पार्टीचे कार्यालय आहे.