गोव्यात भाजपचीच सत्ता येणार, इतर पक्षांशीही बोलणी पूर्ण : देवेंद्र फडणवीस
Goa election result | devendra fadnavis | गोव्यामध्ये भाजपचंच बहुमत येईल, मात्र गरज पडलीच तर इतर पक्षांशी आपलं बोलणं झालं असून भाजपचीच सत्ता येईल, असा दावा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
मुंबई : गोव्यामध्ये भाजपचंच बहुमत येईल, मात्र गरज पडलीच तर इतर पक्षांशी आपलं बोलणं झालं असून भाजपचीच सत्ता येईल, असा दावा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुंबईतला मोर्चा आटोपल्यानंतर फडणवीस तातडीनं पणजीमध्ये दाखल झाले. काँग्रेसचा आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसल्यानं त्यांना डांबून ठेवण्याची वेळ आल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.
गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार असून. उत्पल पर्रिकरांच्या बंडामुळं निवडणुकीत चुरस रंगली आहे. गेल्यावेळची चूक टाळण्यासाठी काँग्रेस निकालाआधीच सावध पवित्रा घेतला आहे. गोव्यामध्ये कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंम्बरम यांच्याकडे निवडणूक प्रभारीपद देण्यात आले आहे. तर कर्नाटकचे कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष डी.के शिवकुमार तातडीने गोव्यात दाखल झाले आहेत.
गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. मात्र कुणालाही बहुमत मिळणार नसून त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याचा अंदाज झी मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.