ममता बॅनर्जींना भाजपचा मोठा धक्का, नगरपालिकेच्या सर्व २६ जागांवर विजय
ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का...
बैरकपूर : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या चांगल्या यशानंतर नगरपालिका निवडणुकीतही भाजपने तृणमुल काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का दिला आहे. मंगळवारी भाटपारा येथे झालेल्या निवडणुकीत भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या आहेत. तृणमुल काँग्रेसला एकही जागा नाही मिळाली.
भाजपचे नवे चेअरमन सौरव सिंह बनले. लोकसभा निवडणुकीनंतर भाटपारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि तृणमुलसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत तृणमुलला पराभवाचा मोठा धक्का दिला.
आतापर्यंत भाजपने पश्चिम बंगालमध्ये एकही नगरपालिकेवर झेंडा फडकवला नव्हता. पहिल्यांदाच भाजपची नगर पालिकेवर सत्ता आली आहे. भाटपारा विधानसभा निवडणुकीतही भाजपचा विजय झाला होता. बैरकपूर मतदारसंघातून भाजपचे अर्जुन सिंह निवडून आले. तृणमूल सोडून भाजपमध्ये आलेल्या सिंह यांनी ३ वेळा खासदार असलेल्या दिनेश त्रिवेदी यांचा पराबव केली होता.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ४२ पैकी १८ जागा मिळाल्या आहेत. २०१४ मध्ये फक्त २ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. २०१९ ची निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची होती. पश्चिम बंगालमध्ये मतदारांपुढे आता नवा पर्याय आला आहे. लोकसभा निवडणुकीसह ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ही भाजपने सर्व ४ जागा जिंकल्या.