गुजरातमध्ये भाजपचा विजय, पण हे झाले नुकसान...
गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे.
गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे.
सध्या आकडेवारीनुसार भाजप १०५ जागांवर आघाडीवर आहे तर ७४ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर इतर ३ आघाडीवर आहे.
भाजपच्या मतांची टक्केवारी घटली...
पण मतांच्या टक्केवारीवर नजर टाकली असता भाजपला २०१२ च्या विधानसभेत ४७.८५ टक्के मते पडली होती. २०१४ च्या लोकसभेत सर्वाधिक ६०.११ टक्के मते मिळाली होती. पण सध्याच्या मतांच्या आकडेवारीत घट झालेली दिसते आहे. त्यात ११ टक्के घट झाली असून तो आकडा ४९ टक्क्यांवर खाली घसरला आहे.
काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढली...
२०१२ च्या विधानसभेत ३८.८५ टक्के मते पडली होती. २०१४ च्या लोकसभेत ३३.४५ टक्के मते मिळाली होती. पण सध्याच्या मतांच्या आकडेवारीत वाढ झालेली दिसते आहे. त्यात ८ टक्के वाढ झाली असून तो आकडा ४१.६ टक्क्यांपर्यंत वर गेली आहे.