Viral News : मुलगी झाल्याचा आनंद एका भाजप कार्यकर्त्याने अनोख्या अंदाजात साजरा केला आहे. या गोष्टीची चर्चा राज्यासह संपूर्ण देशात होत आहे. भाजप कार्यकर्ता अंचल गुप्ता याने मुलगी झाल्याच्या आनंदात त्यांनी तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोपाळमध्ये राहाणारे अंचल गुप्ता हे भाजप कार्यकर्ते असून मुखर्जी नगरात त्यांचं गुप्ता चाट भंडार नावाचं दुकान आहे. अंचल कुमार यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव अंचल यांनी अनोखी असं ठेवलं. अनोखीच्या जन्माचा क्षण तिच्या वडिलांनी अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं. 


यासाठी त्यांनी तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला. रामेश्वर नावाच्या एका व्यक्तीने ही घटना ट्विटरवर शेअर केली आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची महिला सक्षमीकरण मोहीम यशस्वी करण्यात अंचल गुप्ता सारख्या वडिलांचा सहभाग निश्चितच आदर्श ठरवणार आहे.


सीएम शिवराज चौहान यांची प्रतिक्रिया
ही बातमी ट्विटरवर शेअर होताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रामेश्वर यांच्या ट्विटरला प्रतिक्रिया देत अंचल गुप्ता यांना मुलीच्या जन्माच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटरवर त्यांनी लिहिलंय, अनोखीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! नेहमी सुखी आणि आनंदी रहा, उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद.