VIDEO: भाजप कार्यकर्त्यांच्या टोप्या हिसकावून हवेत भिरकावल्या; जिग्नेश मेवाणींचा दावा
या व्हिडीओत भाजपच्या बाईक रॅली दरम्यान, काही लोक भाजप कार्यकर्त्यांच्या, कमळ चिन्ह असलेल्या टोप्या आणि स्कार्फ हवेत उडवत आहेत.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी यांनी, आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भाजपच्या बाईक रॅली दरम्यान, काही लोक भाजप कार्यकर्त्यांच्या, कमळ चिन्ह असलेल्या टोप्या आणि स्कार्फ हवेत उडवत आहेत.
व्हिडीओ बातमीत खाली पाहा
व्हिडीओत भाजपचा झेंडा, हवेत उडवण्यात येत होता, व्हिडीओत असं म्हटलंय की, आम्ही यांची पुष्टी करत नाही. मात्र हा व्हिडीओ गुजरातमधील वजगाम सीटवरील अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेले, दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी शेअर केला आहे. जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलंय की, गर्दीने भाजप कार्यकर्त्यांचं असं स्वागत केलं.
जिग्नेश मेवाणी व्हिडीओ शेअर करताना म्हणतात
जिग्नेश मेवाणी हा व्हिडीओ शेअर करताना म्हणतात, मित्रांनो गुजरातचा हा व्हिडीओ नक्की पाहा, जनता एवढी त्रस्त आहे की, भाजपला मत देणं तर बाजूला राहणार आहे, जनतेने भाजप कार्यकर्त्यांच्या टोप्या आणि स्कार्फ देखील काढून पाहिले. जर भाजपने विकास केला असता, तर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं असं स्वागत केलं नसतं.
दलित हत्याकांडानंतर जिग्नेश आले चर्चेत
या आधी गिर सोमनाथ जिल्ह्याच्या ऊनामध्ये कथित गौहत्येच्या आरोपात, दलित युवकाची हत्या केल्यानंतर, त्या विरोधात आवाज उठवताना जिग्नेश मेवाणी चर्चेत आले होते. जिग्नेश मेवाणी या आधी पत्रकार होते, दलित कांडनंतर त्यांनी गुजरातमधील सत्ताधारी भाजप विरोधात त्यांनी दलित कार्यकर्त्यांची मोट बांधली. प्रत्येक जिल्हा कार्यालयावर त्यांनी प्रदर्शन केलं.
काँग्रेसला साथ नाही, पण भाजपला हरवण्यावर अटळ
गुजरातमध्ये जिग्नेश आधी कोणत्याही दलित कार्यकर्त्याला एवढं समर्थन मिळालेलं नाही. जिग्नेश यांना सतत मिळणाऱ्या जनसमर्थनामुळे, काँग्रेसने त्यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र जिग्नेश हे काँग्रेस सोबत गेले नाहीत, मात्र भाजपला हरवणं हे आपलं एकमेव लक्ष्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.