नवी दिल्ली : नागपूरमधून अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले अशी लढत होणार आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले अहमदनगरचे सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीमधून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मंत्री हंसराज अहीर, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पूनम महाजन, प्रीतम मुंडे यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. लातूरमधून सुधाकरराव श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोळा पैकी चौदा विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. नगर आणि लातूरमधून दोन नवे उमेदवार देण्यात आले आहे. ( उमेदवारांची यादी पाहण्यासाठी स्क्रोल करा )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगर येथून उमेदवारी देताना लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कापण्यात आला आहे  तर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जे पी नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. भाजपने आपल्या पहिल्या यादीत १८२ उमेदवारांची नावे जाहीर केली. महाराष्ट्रातून १६ पैकी १४ विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे. 


पत्रकार परिषद



महाराष्ट्रातील उमेदवार


नंदूरबार - हीना गावित
धुळे - सुभाष भामरे 
रावेर- रक्षा खडसे 
अकोला - संजय धोत्रे 
वर्धा - रामदास तडस 
नागपूर - नितीन गडकरी 
गडचिरोली-चिमुरी - अशोक नेते 
चंद्रपूर- हंसराज अहिर 
जालना - रावसाहेब दानवे 
भिवंडी - कपिल पाटील 
मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी 
मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन 
अहमदनगर - सुजय विखे पाटील 
बीड - डॉ. प्रीतम मुंडे 
लातूर - सुधाकरराव श्रृंगारे 
सांगली - संजयकाका पाटील