भाजप आमदार बोपय्यांची `हंगामी अध्यक्ष` म्हणून निवड, काँग्रेसचा आक्षेप
`कायदेशीर बाबी तपासून मग आपण यावर भूमिका मांडू असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटकात भाजप आमदार के जी बोपय्या यांच्या नावाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. उद्या फ्लोअर टेस्टही बोपय्याचं घेणार आहे. यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. बोपय्या गेल्या वेळी भाजप सरकारमध्ये कर्नाटक विधानसभा अध्यक्ष होते. सध्या ते विराजपेठ मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत.
परंतु, के. जी. बोपय्या यांच्या निवडीला काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतलाय. 'कायदेशीर बाबी तपासून मग आपण यावर भूमिका मांडू असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं. या मुद्द्यावरही आमच्यापुढचे सगळे मार्ग खुले आहेत... परंतु, या मुद्यावर आम्ही कोर्टात कधी जाऊ ते आत्ताच सांगता येणार नाही' असं बोपय्या यांनी म्हटलंय.
हंगामी अध्यक्ष (Pro-tem Speaker) म्हणजे काय?
हंगामी म्हणजे 'काही काळापुरता'... हंगामी अध्यक्षांची निवड राज्यपाल करतात. जेव्हा विधानसभा आपला अध्यक्ष नियुक्त करू शकत नाही अशा वेळी राज्यपाल हंगामी अध्यक्ष नेमू शकतात. हा अध्यक्ष नवनिर्वाचितांना शपथ देतो... आणि संपूर्ण कार्यक्रम यांच्या देखरेखीतच पार पडतो.