भागलपूर : केंद्रातील मोदी सरकारमधील आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांच्या मुलाला हिंसा भडकविल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. १७ मार्च रोजी हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला जातीय हिंसा भडकावल्याचा आरोप अर्जित चौबे याच्यावर होता. भागलपूर इथे झालेल्या या हिंसेत दोन पोलिसांसह काही जण जखमी झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंसा भडकविल्याप्रकरणी अर्जित यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अर्जितने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, त्याने स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली, असे सांगण्यात येत आहे. १७ मार्च रोजी हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला जातीय हिंसा भडकावल्याचा आरोप अर्जितवर होता.


अर्जित चौबे याच्या अटकेवरून भागलपूर परिसरात जोरदार घोषणाबाजी झाली होती. मात्र, न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ३१ मार्च रोजी रात्री अर्जितला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, अर्जित याने आपल्यावरील आरोपांचं खंडन केले आहे. या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर असलेले आरोप संपूर्णतः खोटे आहेत. जर जय श्रीरामच्या घोषणा देणं हा गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी केला आहे, असे त्याने सांगितले.