प्रसिद्ध फॅशन ब्लॉगरला पतीनंच संपवलं, बॉयफ्रेंडनं सांगितलं कशी झाली हत्या
`मी मदतीसाठी ओरडत राहिलो पण पतीने तिला संपवलं`, बॉडफ्रेंडनं सांगितली अंगावर काटा आणणाऱ्या हत्येची कहाणी
मुंबई : सोशल मीडियावर फूड आणि फॅशनब्लॉगसाठी प्रसिद्ध असलेल्या रितिका सिंहची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्या बॉयफ्रेंडच्या घरात घुसून रितिकाच्या पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडने रितिकाची हत्या कोणी केली याबाबत खुलासा केला आहे.
रितिका हत्या प्रकरणात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. शवविच्छेदन अहवालात रितिकाची हाडं मोडली होती. तिच्या गळ्याजवळ रक्त साखळलं होतं. तर रितिकाच्या हत्येबाबत आता तिच्या बॉयफ्रेंडने पोलिसांना माहिती दिली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
रितिका सिंह फूड आणि फॅशन ब्लॉगर होती. तिने आकाश गौतम नावाच्या तरुणाशी 8 वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला. लग्नानंतर 4 वर्षांनी तिची फेसबुकवर विपुल नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यामुळे रितिका आणि आकाशच्या नात्याला तडा गेला. त्यानंतर ती विपुलच्या घरी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात होती.
आरोपी आकाश रितिकाच्या शोधात होताच. त्याला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्याने बॉयफ्रेंडच्या घरी जाऊन त्याने रितिकाची हत्या केली. त्यांनी बॉयफ्रेंड विपुलचे हात बांधून त्याला बाथरुममध्ये डांबून ठेवलं. रितिकाचेही हात बांधून तिला मारहाण करून आरोपीने चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हत्येची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं तर दोन जण फरार झाले आहेत. त्यांचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत.