जोधपूर : देशात ब्लू व्हेल या गेमच्या जाळ्यात अडकून जीव देणा-यांची संख्या वाढतच आहे. याबाबतच नवं प्रकरण राजस्थानच्या जोधपूरमधील आहे. इथे एका १७ वर्षांच्या मुलीने डोंगरावरून तलावात उडी घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलरक्षक आणि पोलिसांच्या मदतीने तिला वाचण्यात यश आलं आहे. ही तरूणी बीएसएफ जवानाची मुलगी आहे आणि सोमवारी रात्री ती बाजारात जात असल्याचे सांगून बाहेर पडली होती. 


ती बाहेर गेल्यावर अनेकदा तिच्या घरच्यांनी तिला फोन लावला. नंतर कळाले की, फोन ती घरीच ठेवून गेली आहे. त्यानंतर परिवाराने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तेव्हा ती तलावात आढळली काही लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. 


पोलीस अधिकारी लेखराज सिहाग यांनी सांगितले की, ‘त्यांनी आणि जलरक्षक ओम प्रकाश यांनी मुलीला तलावातून बाहेर काढले. जेव्हा या मुलीला असे करण्याचे कारण विचारण्यात आले, तेव्हा तिने धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली की, ‘जर तिने असे केले नसते तर तिची आई मरण पावली असती. तिने सांगितले की, ती गेमच्या शेवटच्या स्टेजला होती. जर मी हा टास्क पूर्ण केला नसता केला तर तिची आई मृत्यूमुखी पडली असती. 


याआधी देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये ब्लू व्हेल गेममुळे झालेल्या आत्महत्यांची प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत अशाप्रकारच्या १०० घटना समोर आल्या आहेत.