नवी दिल्ली : भारतात अनेक मुले ब्लू व्हेल गेमची शिकार ठरलेत. या ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात आणखी एक चेन्नईतील १२ वर्षीय मुलगा अडकलाय. या जाळ्यातून सुटका करावी अशी विनवणी तो करतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या तिरुपूरमध्ये राहणाऱ्या या मुलाने १०४ या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला आणि ब्लू व्हेल गेमची शिकार ठरल्याचे सांगितले. यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे अशी विनवणीही त्याने केलीये. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या गेमच्या अॅडमिनला अटक करण्यात आली. 


आमहत्या प्रतिबंधक सेंटर स्नेहाच्या संस्थापक डॉ. लक्ष्मी विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लू व्हेल या धोकादायक गेममुळे भारतातील आत्महत्याचे प्रमाण वाढत चाललेय. मात्र, जे हा गेम खेळतात त्यांना यातून बाहेर यायचे आहे. 


अनेकदा मुले गेमच्या बाहेर येऊ शकत नाहीत कारण त्यांना त्यांचे आई-वडील, भाऊ-बहिण यांना मारण्याची धमकी दिली जाते. ५० दिवसांच्या या गेममध्ये रोज सकाळी ४.२० पर्यंत जागे राहणे, क्रेनवर चढणे, सुईच्या सहाय्याने हातांवर जखमा करणे असे अनेक टास्क दिले जातात. टास्क पूर्ण केल्यानंतर हातावर निशाण बनवावे लागते. अखेरच्या स्टेजमध्ये आत्महत्या करावी लागते.