नवादा : ट्रक दुर्घटनेत एका साथीदाराचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या बीएमपी जवांनानी मेजर रामेश्वर सिंह यांना बेदम मारले. जीव वाचवून मेजर आपल्या ऑफीसच्या दिशेने पळायला लागल्यावर मागे पळत सुटलेल्या जवानांनी त्याला पळवून पळवून बदडले.  बीएमपी जवानांचा आरोप आहे की ट्रक दुर्घटनेनंतर मदतीसाठी मेजरला फोन करण्यात आला तेव्हा मेजरने फोन योग्य वेळी फोन उचलला नाही. जवानांचे म्हणणे आहे की मेजरने योग्य वेळी फोन उचलला असता तर आमच्या साथीदाराचे प्राण वाचले असते. 


दुर्लक्षामुळे गेला जीव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएमपी जवान रविवारी रात्री रजौलीवरून रामनवमीच्या शोभायात्रेनंतर ड्युटी करून नवादा येथे जात होता.  तेव्हा पोलीस वाहन आणि ट्रकमध्ये जबरदस्त टक्कर झाली. दुर्घटनेनंतर योग्यवेळेत इलाज झाला नाही म्हणून जवानाचा मृत्यू झाला.  यानंतर जवानाचे मृतदेह पोलीसलाइनला आणण्यात आले. तेव्हा त्याला जवानांनी अखेरचा निरोप दिला. तेव्हाच मेजर रामेश्वर सिंह पोहचले. मेजरला पाहून संतप्त जवानांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मेजरने आपले प्राण वाचविण्यासाठी ऑफिसकडे पळ काढला. त्याच्या मागे पळणाऱ्या जवानांनी त्यांना तशाच अवस्थेत मारले. 


 


व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा 



बिहार पोलिसांकडे सुविधांची कमतरता 


संपूर्ण प्रकरणावर एसपी विकास वर्मन यांनी सांगितले की, जवान राजौलीवरून परतत असताना जवानांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मृत्यूनंतर जे काही झाले ते दुर्दैवी होते. असे व्हायला नको होते. बिहार पोलिसांकडे सुविधांची कमतरता आहे. 


जवानांचा आरोप


जखमी जवानाला योग्य वेळेत गाडी मिळाली असती तर त्याचे प्राण वाचले असते. ही गाडी दोन तास अगोदर मिळायला हवी होती. तर हा जवान वाचला असता. सर्वांच्या प्राणाची रक्षा आम्ही करतो आमच्या प्राणांची रक्षा कोण करणार असा सवालही संतप्त जवानांनी केला आहे. मेजरच्या हुकमशाही वागणुकीमुळे जवानाचे प्राण गेले. सूचना देण्यासाठी फोन केला पण त्यांनी फोनच उचलला नाही. नंतर बोलणे झाले तर गाडीत डिझेल नाही आहे असे उत्तर आले. त्यामुळे योग्यवेळेत उपचार झाले नाहीत.