सिंगल चार्जमध्ये 270 km पर्यंत चालणारी BMW ची भन्नाट कार? अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज
MINI Cooper SE : BMW INDIA च्या वतीने 24 फेब्रुवारीला आपली एकदम नवीन, इलेक्ट्रिक कार MINI cooper SE लॉंच करणार आहे.
नवी दिल्ली : बीएमडब्लू इंडियाने आयएक्स इलेक्ट्रिक एसयुव्हीसोबत भारतीय बाजारात प्रवेश केला. आता कंपनी 24 फेब्रुवारीला इलेक्ट्रिक मिनी कूपर एसई ही एसयुव्ही लॉंच करणार आहे. परंतू लॉंच होण्याआधीच या कारचे सर्व म्हणजेच 30 युनिटची विक्री झाली आहे. 1 लाख रुपये बुकिंग रक्कम भरून कार बुक करण्यात आल्या होत्या.
शानदार डिझाइन असलेली कार
या कारची डिझाइन उत्तम आहे. इलेक्ट्रिक वेरिएंटच्या या कारमध्ये तीन दरवाजे असलेले मॉडेल बाजारात येणार आहे. इलेक्ट्रिक कारला सिग्नेचर गोल आकाराचे हेडलाईट उपलब्ध आहेत. 2022 मिनीकूपर एसईच्या कॅबिनमध्ये 8.8 इंच टचस्क्रिन सिस्टिमसह डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहेत.
नवीन मिनी इलेक्ट्रिक कूपर कार अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. हायटेक तंत्रज्ञानासह एकदा पूर्ण चार्ज केल्यास कार 270 किमी पर्यंत धावू शकते. कारला 11 किलोवॅट आणि 50 किलोवॅटच्या चार्जरने चार्ज करता येईल. या चार्जरने चार्ज केल्यास अनुक्रमे 2.5 तास आणि 35 मिनिटे लागू शकतात.