राजस्थान : कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत बोट बुडाली आहे. नदी पार करत असताना ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून १० पेक्षा अधिक जण अद्यापही बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच इटावा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोटीतील सर्व प्रवासी इटावा क्षेत्रातील आसपासच्या गावातील आहेत. बेपत्ता लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नदीवर पूल नसल्यानं गावकऱ्यांना बोटीनं ये-जा करावी लागते. त्यामुळे बहुतांश वेळा सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळून प्रवासी वाहतूक केली जाते. दरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेतही नाविकांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं बोललं जातंय. त्याचप्रमाणे स्थानिक लोक प्रशासनाला देखील दोषी ठरवत आहेत. 


बोटीमध्ये सवार असलेले सर्व प्रवासी पूजेसाठी कमलेश्वर महादेव मंदीराच्या दिशेने जात होते. परंतु बोटीमध्ये अधिक लोक असल्यामुळे बोट बुडाल्याचं कारण समोर येत आहे. अशी घटना या परिसरात प्रथमच घडली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.