मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी बोगीबील पुलाचं उद्घाटन करणार आहेत. या पुलावरून जाणाऱ्या पहिल्या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या स्मृतीप्रित्यर्थ या बोगीबील रेल्वे पुलाचं उद्घाटन करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा दिवस केंद्र सरकारद्वारे 'सुशासन दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. तिनसुकिया - नाहरलगुन इंटरसिटी एक्सप्रेस सप्ताहातून 5 दिवस चालणार आहे. 


या एकूण 4.9 किमी लांब पुलामुळे आसामच्या तिनसुकिया ते अरूणाचल प्रदेशच्या नाहरलगुन कस्बेपर्यंत हा प्रवास होणार आहे. या प्रवासाला एकूण 10 तासांचा कालावधी लागणार आहे. 


नितिन भट्टाचार्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळेला पार करण्यासाठी जवळपास 15 ते 20 तास लागत असतं. मात्र आता साडे पाच तासांचा वेळ लागणार आहे. तसेच या अगोदर प्रवाशांना अनेक रेल्वे बदलाव्या लागत असतं. पण आता एकाच रेल्वेने हा प्रवास होणार आहे. 



एकूण 14 कोचची ही चेअर कार रेल्वेगाडी तिनसुकियापासून दुपारी रवाना होणार असून नाहरलगुनला सकाळी पोहोचणार आहे. बोगीबील पुल आसामच्या डिब्रगूड जिल्ह्यातील ब्रम्हपुत्र नदीवर दक्षिण तटाला अरूणाचल प्रदेशाच्या सीमवर्ती धेमाजी जिल्ह्यावरील सिलापाथरला जोडणार आहे. 


हा पुल आणि रेल्वे सेवा धेमाजीतील लोकांकरता अतिशय महत्वाचं आहे. कारण हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि विमानतळ डिब्रूगड येथे आहे. याचा लाभ ईटानगरमधील नागरिकांबरोबरच सगळ्यांना होणार आहे. 


आशियातील दुसऱ्या सर्वात लांब रेल्वे पुल बोगीबीलाचा कालावधी हा जवळपास 120 वर्षांचा आहे. मुख्य अभियंता मोहिंदर सिंह यांनी सांगितलं की, ब्रम्हपुत्र नदीवरील 4.9 किमी चा सर्वात लांब पुल देशातील पहिला पूर्णपणे जोडलेला पुल आहे. 


या पुलाच्या निर्मिती करता 5,900 करोड रुपये खर्च आला असून याचा कालावधी 120 वर्षांचा आहे. आसाम ते अरूणाचल प्रदेशमधील प्रवास कमी होऊन आता फक्त चार तासांवर होणार आहे.