नवी दिल्ली : बॉलिवूडचा आशिकी बॉय अभिनेता राहुल रॉय याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल रॉय याने केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते विजय गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.


पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचं केलं कौतूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रसंगी राहुल रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची प्रशंसा केली. राहुल रॉय याने यावेळी म्हटलं की, 'हा माझ्यासाठी एक विशेष दिवस आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह ज्या पद्धतीने देशाची प्रगती करत आहेत. जगाच्या नजरेत भारताची प्रतिमा जशी बदलत आहे ते प्रशंसनीय आहे.


'आशिकी' सिनेमातून झाला होता हिट


भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने म्हटलं की मी संधी बघून भाजपमध्ये नाही आलो. मी आता ही माझं अॅक्टींग करिअरला सुरु ठेवेल. त्याच्या हातात आता ४ सिनेमे आहेत. राहुल रॉय १९९० मध्ये आलेल्या 'आशिकी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये हिट झाला होता.