मुंबई : राहुल गांधी अनपेक्षितपणे मोदींची गळाभेट घेण्यासाठी गेले तेव्हा मोदींच्या आजुबाजुला बसलेल्या ज्येष्ठांनाही आश्चर्याचा धक्का बसला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे दृश्य पाहून अवाक झाले. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही थोड्यावेळासाठी काय चाललंय ते कळत नव्हतं. मात्र, त्याचवेळी मागच्या बाजुला बसलेले विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा हे जोरात टाळ्या वाजवत होते. राहुल यांची ही गळाभेट ऐतिहासिक ठरली असून देशभरात याबद्दल प्रतिक्रीया येत आहे. यामध्ये बॉलीवुडकरही कुठे मागे राहिले नाहीत. त्यांनीही सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार रावने आज आधिकृत 'हग डे' असल्याचे म्हटले.



तर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री श्रुती सेठने सर्वांना हग डे विश केलं.



दिग्दर्शक अनुभव सिंहा यांनीदेखील राहुल गांधी यांच्या गळाभेटीवर आपली प्रतिक्रीया दिलीयं.



प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता रणवीर शौरीने देखील आपली प्रतिक्रीया सोशल मीडियावर मांडली आहे.



मिठी वादात 



भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या या कृतीची खिल्ली उडविली आहे.



राहुल गांधींना राजकारण सोडून बॉलिवूडमध्ये जावं, असा टोला भाजप नेत्यांनी लगावला. तर दुसरीकडे मोदींना मारलेल्या मिठीवरून काँग्रेस खासदारांनी आपल्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींचे समर्थन केले. त्यांच्या भाषणाचं भाजपाच्या खासदारांनीही खासगीत कौतुक केल्याचे एका नेत्याने सांगितले.