Girlfriend Friend Commits Suicide: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) झांसीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडवर नाराज होऊन एका मुलीने आत्महत्येचं पाऊल उचलले आहे. (Girlfriend Boyfriend) तरुणीच्या आत्महत्येचं (School Girl Suicide) कारण धक्कादायक कारण समोर आलं आहे. कारण ऐकून पोलिसही (Police)  हैराण झाले आहेत. (9th std girl Commits Suicide)


किचनमध्ये आत्महत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैत्रिणीच्या प्रियकराने तरुणीकडे दुसऱ्या मुलीचा फेसबुक आयडी मागितला होता. याचाच तिला राग आला होता. दुसऱ्या मुलीबद्दल चौकशी केल्याचा राग मनात धरुनच तरुणी तिच्या घरी परतली होती. घरी पोहोचल्यानंतर तिने किचनमध्ये जात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीने क्षुल्लक कारणावरुन टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेवरुन त्यांनी मुलाला दोषी ठरवले आहे. 


तरुणावर गंभीर आरोप


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणावरच गंभीर आरोप केले आहेत. सदर तरुण हा गावातच राहतो व गेल्या काहि दिवसांपासून तो तिला त्रास देत होता, असा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर, एकीकडे तरुणाच्या कुटुंबीयांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या मुलाने दुसऱ्या एका मुलीचा फेसबुक आयडी मागितला होता. त्यामुळंच ती काळजीत होती आणि म्हणूनच वैतागून तिने घरातील किचनमध्ये जाऊन आत्महत्या केली आहे, असं तरुणाच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. 


तरुणीवर चाकुने ४० वार, नंतर दगडाने ठेचून ठार केले, दिल्लीत भररस्त्यात थरार 


मुलगी नववीच्या वर्गात


गळफास लावून आत्महत्या केलेली मुलगी ही अल्पवयीन असून ती इयत्ता नववीच्या वर्गात शिकते. याप्रकरणात मुलाच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, तरुणी रात्री अपरात्री त्यांच्या मुलाला फोन करुन गप्पा करत असे. आरोपी मुलाच्या कुटुंबीयांनी अनेकदा दोघांना रंगेहाथ पकडले होते. यावरुनच त्यांनी त्याला मारहाणही केली होती, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा मुलगा दुसऱ्या मुलीचा फेसबुक आयडी मागत होता, हे पूर्णपणे खोटे आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.


पुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या


प्रेम-प्रकरणातून टोकाचा निर्णय


दरम्यान, प्रेम-प्रकरणातून मुलीने आत्महत्येचा केली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मयत तरुणी आणि आरोपी मुलाच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यावरुन या प्रकरणाचा गुंता अजून वाढला आहे. या प्रकरणी झांसीचे पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व प्रकरणी तपास सुरू आहे.