इंदूरमध्ये ग्रामस्थांनी लावलं दोन तरुणांचं लग्न, कारण ऐकल्यावर तुम्हालाही बसेल धक्का
आजही आपल्या समाजात कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्यांना परंपरेचं नाव देत पूढे चालविल्या जात आहेत. असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये घडला आहे.
इंदूर : आजही आपल्या समाजात कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्यांना परंपरेचं नाव देत पूढे चालविल्या जात आहेत. असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये घडला आहे.
ग्रामस्थांनी चक्क दोन तरुणांचं लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार इंदूरमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी एका तरुणाने दुस-या तरुणासोबत सात फेरे घेतले आणि सातही जन्म एकत्र जगण्या-मरण्याची शपथही घेतली. या लग्नासाठी खास मंडपही सजविण्यात आला होता.
तुम्ही समजत असाल की या तरुणांचं लग्न समलैंगिक संबंधातून लावण्यात आलं असेल मात्र, तसं काहीही नाहीये. तर, हे लग्न केवळ अंधश्रद्धेतून लावण्यात आलं आहे. पाहूयात काय आहे हा प्रकार...
अंधविश्वासाचा आहे हा प्रकार
हे लग्न समलैंगिक संबंधातून नाही तर अंधश्रद्धेपोटी लावण्यात आलं आहे. इंदूरमध्ये पाऊस पडत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. या ग्रामस्थांचा विश्वास आहे की, एखाद्या तरुणाचं दुस-या तरुणासोबत लग्न लावून दिल्यास पाऊस पडतो. त्यामुळे याच अंधश्रद्धेतून या दोघांचं लग्न लावण्यात आलं आहे.
लग्नानंतर कोसळला पाऊस
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर थोड्याच वेळात जोरदार वा-यासह पाऊसही कोसळला. दरम्यान, इंदूर परिसरात पुढील आठवड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानेही वर्तवला आहे.