अपहरण करायला गेले एक अन् भलतंच घडलं, ID वरून झाला घोळ, घटना CCTV मध्ये कैद!
जयपूरमधील (Jaipur) आग्रा हायवेवर धक्कादायक घटना, करायला गेले एक अन् भलतंच घडलं...
Crime News : जयपूरमधील (Jaipur) आग्रा हायवेवरून मंगळवारी रात्री आठच्या सुमारास एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर सुमारे एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर चोरटे कारमधून निघून गेले. वास्तविक, तरुणाचा आयडी पाहून त्यानं चुकीच्या तरुणाला उचलून नेल्याचं दिसून आलं. खोह नागोरियन (Khoh Nagorian) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद सिटीजवळील एका ढाब्यासमोर ही घटना घडली. ही घटना मॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
जयपूरच्या (Boy kidnapped in jaipur agra highway) आग्रा हायवेवर एका तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तरूणांना बळजबरीने गाडीत बसवताना दिसत आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग्रा हायवेवर कारमधील आरोपींनी एका तरुणाचं अपहरण केलं.
नेमकं काय घडलं?
आयडी पाहिल्यानंतर त्याला अर्धा किलोमीटर दूर घेऊन घेऊन गेले आणि नंतर त्याला सोडून देण्यात आलं. कारण चोरट्यांनी त्या तरुणाचं अपहरण चुकून दुसऱ्याच्या जागेवर केलं होतं. ही घटना एका रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कॅमेऱ्यात चोरटे तरुणाला जबरदस्तीने घेऊन जाताना दिसत आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या खोह नागोरियन पोलीसांनी यावर स्पष्टीकरणं दिलंय. त्यानंतर नेमकं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना मिळाली आहेत.
आणखी वाचा - Video: रशियन मुलीनं गायली Hanuman Chalisa, ऐकाल तर तुम्हीही हात जोडाल
दरम्यान, आरोपी महिपाल नावाच्या व्यक्तीचे अपहरण करण्यासाठी आले होते आणि गैरसमजातून बागराणा येथील अजयचं अपहरण केलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.