नवी दिल्ली : सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचं क्षेत्र असलेल्या आजमगढमध्ये एका तरुणीला जिंवत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबातील व्यक्तींनी आरडाओरड केल्यानंतर आजुबाजुचे लोकं धावले आणि त्यांनी त्या युवकाला धरलं आणि त्याची चांगलीच धुलाई केली. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी मुलीला वाराणसी येथे पुढील उपचारासाठी पाठवलं. या घटनेत मुलगी 90 टक्के भाजली आहे. डॉक्टर तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलीची स्थिती सध्या नाजूक आहे. लोकांच्या मारहाणीनंतर जखमी झालेल्या युवकाला ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


आरोपी युवक अनेक दिवसांपासून मुलीला त्रास देत होता. तो फोन नंबरसाठी तिला जबरदस्ती करत होता. या दरम्यान तो तिच्या सोबत छेडछाड करु लागला. मुलीने विरोध केल्यानंतर युवकाने तिला पेटवून दिलं. गावात सध्या तणावाचं वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.