Bharat Matromony Ad Controversy: एखादा सण- उत्सव असला की त्यानिमित्तानं शुभेच्छा देणं आलंच. या शुभेच्छा सहसा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेजच्या माध्यमातून दिल्या जातात. पण, तुम्ही कधी एखादी शुभेच्छा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहिलंय का? सध्या भारत मॅट्रिमोनी (Bharat Matrimony ) या पोर्टलला याचा अनुभव येत आहे. कारण, सोशल मीडियावर या पोर्टवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या (Viral Video) व्हिडीओमध्ये होळी किंवा तत्सम प्रसंगी महिलांवर होणारा अत्याचार आणि त्यानंतर त्यांच्या मानसिकतेवर होणारा आघात अधोरेखित करताना जिसत आहे. अनेकदा सणउत्सवात सहभागी होण्यापासूनही महिलांना रोखलं जातं, विरोध झाल्यास त्यांच्यावर हातही उगारला जातो. नाही म्हटलं तरी पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता असणाऱ्या समाजात आजही असे प्रकार घडतात. हाच मुद्दा भारत मॅट्रिमोनीच्या जाहिरातीतून सर्वांसमक्ष आणला गेला. 


व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं गेलं... 


'या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं गेलं, या महिला दिनी आणि होळीच्या (Bharat Matrimony holi 2023 video) दिवशी चला महिलांसाठी सर्वसमावेशक आणि अधिक सुरक्षित वातावरणनिर्मिती करुया. सार्वजनिक ठिकाणांवर महिलांपुढे येणारी आव्हानं लक्षात घेणं गरजेचं आहे. शिवाय अशा समाजाची निर्मिती करणं गरजेचं आहे तिथं महिलांचा आणि त्यांच्या हिताचा आदर केला जाईल... आज आणि कायम....', असं कॅप्शन हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं गेलं. 


व्हिडीओवरून मतमतांतरं.... 


भारत मॅट्रिमोनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यामागचा हेतू काहींना पटला. तो मांडण्याची कलात्मकता अनेकांनीच उचलून धरली. काही महत्त्वाचे मुद्दे आजही दुर्लक्षित आहेत असं म्हणत काही नेटकऱ्यांनी या जाहिरातवजा व्हिडीओला उचलून धरलं. पण, एका फळीनं मात्र नाराजीचा तीव्र सूर आळवला. 


हेसुद्धा वाचा : Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात 


 






'तुम्हाला शरम वाटत नाही का? हिंदू धर्मिय नकोसे झाले आहेत का तुम्हाला?', 'एखाद्या हिंदू सणासोबत असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं तुमचं धाडसच कसं होतं?', 'होळी आणि घरगुती हिंसा यांचा काही संबंध आहे का? डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं?' अशा शब्दांक काही युजर्सनी भारत मॅट्रिमोनीवरच बंदी घालण्याची मागणी केली आहे. सध्या या मुद्द्यावरून बरीच मतमतांतरं झाल्याचंही पाहायला मिळत आहे. तुमचा या व्हिडीओबाबत काय विचार?