प्रियकराने प्रेयसीला रस्त्यावर जिवंत जाळले...
सिकंदराबादमध्ये एका व्यक्तीने २५ वर्षांच्या युवतीला गुरूवारी जिवंत जाळले.
हैद्राबाद : सिकंदराबादमध्ये एका व्यक्तीने २५ वर्षांच्या युवतीला गुरूवारी जिवंत जाळले.
धक्कादायक घटना
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीला आगीच्या थारोळ्यात लोटणारी ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तिचा प्रियकर आहे. त्या मुलीची स्थिती अत्यंत नाजूक आहे. गुरूवारी ६ वाजून ४५ मिनीटांनी लालगौडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
काय आहे हा प्रकार ?
या व्यक्तीने पीडित महिलेला घटनास्थळी बोलावले. त्यानंतर परिस्थितीचा ताबा घेत त्याने महिलेवर केरोसिन टाकले आणि पेटवून दिले. महिलेच्या आवाजाने आसपासच्या लोक मदतीला धावून आले आणि तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. तिची परिस्थिती मात्र गंभीर आहे.
तिची स्थिती अत्यंत नाजूक
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ती महिला ६०% भाजली असून तिची स्थिती नाजूक आहे. आरोपी व्यक्ती त्या महिलेचा प्रेमी असून तो तिला सातत्याने त्रास देत होता. हाती लागलेल्या पुराव्यांवरून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याचबरोबर आरोपीचा तपास देखील सुरू आहे.