पोराला नायला पोरगी दारात! लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने शिकवला चांगलाच धडा...
Trending News : प्रेयसीच्या हट्टापुढे प्रियकराला झुकावचं लागलं आणि शेवटी दोघांनी लग्नगाठ बांधली. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या संपूर्ण शहरात सुरुय. तसेच प्रेयसीच्या या अनोख्या आंदोलनाचे अनेकांनी कौतुक केले आहे
Trending News : आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणी कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. प्रेमात अनेक जण शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ देण्याचे आश्वासन देत असतात. पण ऐन वेळी हे फक्त आश्वासन ठरतं आणि प्रत्याक्षात मात्र यातलं काहीच होत नाही. असाच काहीसा प्रकार झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये समोर आलाय. पण याप्रकरणात प्रेयसीने आपला हट्टाला पेटून आपल्या प्रियकराला मिळवलं आहे.
धनबादच्या महेशपूर परिसरात हा अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळाली. मात्र या लव्हस्टोरीचा शेवट मात्र गोड झालाय. 80 तासांपासून प्रेयसी ही प्रियकराच्या घराबाहेर बसून होती. शेवटी प्रेमाचा विजय झाला आणि प्रेयसीने प्रियकरासोबत लग्नाची गाठ बांधली. तीन दिवसांपेक्षाही अधिक काळ प्रियकराच्या घराबाहेर बसून प्रेयसीने शेवटी तिच्या प्रियकरासोबत लग्न केले आहे. प्रेयसीने लग्नासाठी केलेल्या अनोख्या या आंदोलनानंतर महेशपूर पंचायतीचे प्रमुख मनोज महतो यांच्या मध्यस्थीनंतर मुलाच्या बाजूचे आणि मुलीच्या बाजूचे कुटुंबीय गंगापूर येथील देवीच्या मंदिरात पोहोचले. मंदिराचे पुजारी उदय तिवारी यांनी सर्व विधी पार पाडून हा विवाह पार पाडला. यावेळी शेकडो ग्रामस्थही उपस्थित होते.
पूर्व वसुरिया इथे राहणारी निशा आणि महेशपूर येथील उत्तम महतो यांच्यात गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचाही साखरपुडा झाला होता. मात्र लग्नाच्या 20 दिवस आधी प्रियकर उत्तमने तिला लग्न करायचे नसल्याचे सांगितले. त्यानंतर निशा तिच्या कुटुंबीयांसह प्रियकराच्या घरी आली आणि तिने उत्तमच्या घराबाहेरच उपोषणाला बसली. हे सर्व पाहून तिचा प्रियकर उत्तम आणि त्याच्या कुटुंबीयांनी तेथून पळ काढला.
हा सर्व प्रकार पाहून मुलीचे कुटुंबियसुद्धा संतापले. शेवटी निशाच्या वडिलांनी राजगंज पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कुटुंबियांना बोलवले. यानंतर अनेक बैठका झाल्या आणि शेवटी मुलगा लग्नाला तयार झाला. त्यानंतर निशा आणि उत्तमचे लग्न लावून देण्यात आले. दुसरीकडे आपलं प्रेम मिळाल्याच्या आनंदात निशाने पोलिसात दाखल केलेली तक्रार देखील मागे घेतली.