मुंबई: बरेचदा आपण अगदी सहज ऐकतो की कपल किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकमेकांना बाबू, पिल्लू, सोनू, जाणू बबडी अशी अनेक नावं ठेवून त्याच नावानं हाक मारतात. मात्र बॉयफ्रेंडनं चक्क नाव ठेवलं म्हणून गर्लफ्रेंड चिडली आणि चक्क धोकेबाज असं म्हणून मोकळी झाली. तिला आपल्या बॉयफ्रेंडवर संशय देखील आहे. नावावरून या दोघांमध्ये खूप वादही झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरर डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार तरुणीनं ही संपूर्ण घटना समोर आणली आहे. घरात नवीन पाळीव मांजर आणायचं होतं. त्याचं नाव काय ठेवायचं यावरून दोघांमध्ये वाद झालं. तिच्या बॉयफ्रेंडनं नावं सांगितलं मात्र एकही नाव या तरुणीला पसंत आलं नाही. तरुणानं तिच्या बॉयफ्रेंडला त्याने सांगितलेली नावं खूपच साधी असल्याचं सांगितलं. 


तरुणीच्या म्हणण्यानुसार तिच्या बॉयफ्रेंडनं सांगितलेली नावं खूपच साधी होती. त्यामध्ये जे तिच्या बॉयफ्रेंडला मांजरीचं नाव ठेवायचं होतं तेच नाव त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं होतं. तिचं नाव या मांजरीला ठेवण्यासाठी त्याने आपल्या बाजूनं जोर लावला होता. हेच नाव या मांजरीला कसं योग्य आहे हे त्याने मला पटवून देण्याचा प्रयत्नही केला. 


त्या तरुणीनं पुढे सांगितले की तिला हा सगळा मूर्खपणा आहे हे माहीत होतं. त्याला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव याच मांजरीला ठेवायचं होतं. तो अजूनही तिला विसरला नव्हता हेच यावरून सिद्ध होतं. पुढे तरुणी म्हणाली की 'माझ्या प्रियकराच्या बहिणीच्या मांजरीने अलीकडेच बाळांना जन्म दिला आणि आम्ही त्यापैकी एकाला घरी नेण्याचा विचार करत होतो. त्याने त्याच्या नवीन लहान मित्रासाठी त्याचे घर तयार केले'. 


'आम्ही मांजरीच्या पिल्लाच्या नावावर वाद घालण्यास सुरुवात केली. माझ्या प्रियकराला मांजरीचे नाव देण्यासाठी आधी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव सुचवलं आणि मग माझं डोकंच फिरलं. त्यावरून आमच्यात वाद झाला आणि म्हणून मी त्याला धोकेबाज असं म्हटलं' असंही या महिलेनं सांगितलं आहे.