चांदीपूर : जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जाणारं 'ब्रम्होस'ची 'सुखोई 30 एम.के.आय' या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशामधल्या चांदीपूरच्या वायूदलाच्या तळावरून ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह सुखोईनं उड्डाण केलं. त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या लक्ष्याचा क्षेपणास्त्रानं अचूक वेध घेतला. 


आजवर केवळ युद्धनौकांवरून ब्रह्मोज डागण्याची भारताची क्षमता होती. मात्र आता हवेतूनही या क्षेपणास्त्राचा मारा करता येणार असल्यामुळे वायूदलाची ताकद अनेक पटींनी वाढल्याचं मानलं जातंय.


ही ऐतिहासिक घटना असल्याचं सांगत संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांचं कौतुक केलंय.