ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका! व्यवहारांच्या शुल्कात मोठी मोठी वाढ
ICICI बँकेच्या ग्राहकांना 1 ऑगस्टपासून बँकींगसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
मुंबई : ICICI बँकेच्या ग्राहकांना 1 ऑगस्टपासून बँकींगसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ICICI बँक रोखीच्या व्यवहारांसह अनेक बँकिंग सेवांचे चार्ज वाढवणार आहे. हे बदल बचत खात्यासाठीही लागू असणार आहेत. ICICI बँकेत तुमचे खाते असेल तर, नक्की बदल काय झालेत ते पाहा
फ्री लिमिटनंतर 150 रुपये ट्रान्जॅक्शन
ICICI बँकेने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना महिन्याला 4 फ्री कॅश ट्रान्जॅक्शनची सूट देण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून 4 पेक्षा जास्तच्या कॅश ट्रान्जॅक्शनवर प्रति ट्रान्जॅक्शन 150 रुपये चार्ज भरवा लागणार आहे. होम बँचमधून 1 लाखापर्यंतच्या कॅश ट्रान्जॅक्शनवर सूट असणार आहे.
चेक बुकचे चार्ज
ICICI बँकेच्या ग्राहकांना वर्षातून 25 लीव्सच्या चेकबुकसाठी कोणताही चार्ज आकारला जाणार नाही. त्यानंतर प्रति 10 लीव्ससाठी 20 रुपये जादा चार्ज भरावा लागणार आहे.
नॉन होम ब्रँचचे ट्रान्जॅक्शन चार्ज
नॉन होम ब्रॅंचमधून एका दिवसात 25 हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्जॅक्शनवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. यापेक्षा जास्त ट्रान्जॅक्शन झाल्यास 5 रुपये प्रति 1000 रुपये इतका चार्ज ग्राहकांना द्यावा लागेल.
ATM ट्रान्जॅक्शनचे चार्ज
बँकेच्या संकेतस्थळानुसार, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकता, बंगळुरू, हैद्राबाद सारख्या 6 मेट्रो शहरांमध्ये 3 Financial आणि non Financial ट्रान्जॅक्शन फ्री असतील. अन्य दुसऱ्या शहरामंध्ये 5 ट्रान्जॅक्शन फ्री असतील. त्यानंतरच्या Financial ट्रान्जॅक्शन साठी 20 रुपये आणि Non Financial ट्रान्जॅक्शनसाठी 8.50 रुपयांचा चार्ज ग्राहकांना भरावा लागेल.