तब्बल 6 महानगरपालिका असलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा; ओळखीचे नाव नव्याने ऐकून आश्चर्यचकित व्हाल

Thane District : महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सहा महानगरपालिका आहेत जाणून घेऊया. 

| Nov 10, 2024, 21:27 PM IST

Maharashtra Districts : आकारमानाने फार मोठे नसले तरी महाराष्ट्र हे भारतातील नेहमी चर्चेत असणारे आणि  जगभरात दबदबा  असणारे राज्य आहे. कारण, देशाची आर्थिक राजधानी असलेले  मुंबई हे शहर आपल्या महाराष्ट्रात आहे.  महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र महानगरपालिका तसेच नगरपालिका आहेत. मात्र, महाराष्ट्रात एका असा जिल्हा आहे जो आकारमानाने फार मोठा नसला तरी या जिल्ह्यात तब्बल 6 महानगर पालिका आहेत.

1/8

आकारमानाने अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तरी देखील येथे एकच महानगर पालिका आहे. तर, दुसरीकडे एक असा जिल्हा आहे जो लहान असूनही येथे तब्बल सहा महानगर पालिका आहेत. या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. 

2/8

भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. यामुळेच येथे भिवंडी निजामपूर महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. 

3/8

उल्हासनगर महानगरपालिका देखील  ठाणे जिल्ह्यात येथे. उल्हासनगर हे देखील ठाणे जिल्ह्यातील प्रमुख व्यापरी केंद्र आहे. 

4/8

मीरा-भाईंदर महानगरपालिका देखील ठाणे जिल्ह्यात येते. मुंबई शहराच्या पश्चिमेला लागून असलेल्या उपनगराच्या बाजूला  मीरा-भाईंदर शहर आहे.   

5/8

ठाणे जिल्ह्यातील  कल्याण डोंबिवली परिसर झपाट्याने विकसीत आहे. यामुळेच येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे.   

6/8

 नवी मुंबई महानगरपालिका देखील ठाणे जिल्ह्यातच येते.  नियोजीत शहर अशी नवी मुंबई शहराची ओळख आहे. 

7/8

ठाणे महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. 

8/8

तब्बल सहा महानगर पालिका असलेला हा जिल्हा मुंबई शहराला अगदी लागूनच आहे. हा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा.