Mulayam singh yadav Death : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 ऑगस्टपासून त्यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे आणि रक्तदाबाच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यामुळे 1 ऑक्टोबरपासून त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं, पण अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. यंदाच्याच वर्षी मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या पत्नी, साधना गुप्ता (Sadhna Gupta) यांचंही निधन झालं होतं. 


कुस्तीपटू कसा झाला देशातील मोठा राजकारणी... ? 
22 नवंबर 1939 ला जन्मलेल्या मुलायम यांचा पाच भावंडांमध्ये तिसरा क्रमांक. त्यांनी कुस्तीपटू म्हणून आपल्या आयुष्यातील एका नव्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढे ते प्राध्यापकही झाले. महाविद्यालयांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. पुढे राजकारणातील गुरु, नत्‍थू सिंह यांना प्रभावित केल्यानंतर त्यांनी जसवंतनगर विधानसभा सीटवरून निवडणुकांच्या रिंगणात पाऊल ठेवलं. 1982-1985 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. 



लोहिया आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांना अनेकजण राजकारणआतील कुस्तीपटू म्हणूनही संबोधत होते. विरोधकांना चितपट करण्यासाठी ते ओळखले जात होते. देशाच्या सर्वात मोठ्या, उत्तर प्रदेश क्षेत्रात त्यांनी राजकीय क्षेत्रात अविश्वसनीय उंची गाठली होती.