Bride Calls Of Wedding: लग्न म्हटल्यानंतर गाणी आणि संगीताचा कार्यक्रम आलाच. त्यातही चित्रपटांमुळे अनेकांना फिल्मी स्टाइल लग्न करण्याची इच्छा असते. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे आपलंही एकदम भारी आणि भन्नाट लग्न व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र कधीतरी या प्रयत्नांमध्ये सीमा ओलांडल्या जातात आणि होत्याचं नव्हतं होऊन बसतं. असाच काही प्रकार घडला उत्तर प्रदेशमध्ये घडला. रविवारी येथील एका लग्नात मुलीला वरमाला घालण्याआधी नवऱ्या मुलाने अभिनेता शाहरुखची स्टाइल मारत डायलॉगबाजी केली आणि लग्नचं मोडलं. नाही ही मस्करी नाही खरोखरच असा प्रकार घडला आहे. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, नवरा मुलगा वऱ्हाड्यांसहीत मुलीच्या घरी पोहचला. त्यानंतर सर्वांचं स्वागत वगैरे झालं. आणि लग्न लागण्याच्या काही क्षण आधीच मंचावर नवऱ्या मुलाने शाहरुख खानचं गाणं म्हणत अचानक डान्स करण्यास सुरुवात केली. जयमालाच्या नियोजित कार्यक्रमाऐवजी नवरा मुलगा मंचावर नाचू लागल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नवऱ्या मुलीलाही हा सारा प्रकार पाहून प्रचंड राग आला. 


नवरा काय म्हणत होता?


मात्र कोणाचंही काहीही न ऐकता नवरा मुलगा जवळजवळ गोंधळ घातल्याप्रमाणे नाचू लागला. तो कोणाचंही एकण्यास तयार नव्हता. "मरते दम तक लेकर जाऊंगा दुल्हनिया. आशिक हूं मैं कातिल भी हूं, सब के दिलो मे शामील भी हू. वादों से अपने मुकरता नहीं, मारने से मैं कभी डरता नहीं," असं म्हणत हा नवरा मुलगा स्टेजवर नाचत होता. मात्र हा सारा प्रकार मुलीकडच्यांना अजिबात आवडला नाही. मुलीकडचे लोक गोंधळून गेले आणि नेमकं काय सुरु आहे हेच समजायला मार्ग नसल्याने हतबल झाले.


लग्नमंडपात पोलिस


बरं घरच्यांचा उडालेला गोंधळ आणि नियोजित कार्यक्रमाचा झालेला फज्जा पाहून मुलीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. नवऱ्या मुलाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं कारण देत नवरीकडच्यांनी हे लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणानंतर नवऱ्याकडील वऱ्हाड्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला. जवळजवळ हाणीमारीपर्यंत प्रकरण जाणार असं वाटत असतानाच वऱ्हाड्यांपैकी कोणीतरी जवळच्या पोलीस स्थानकात याबद्दलची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवऱ्या मुलाला ताब्यात घेतलं. 



मुलीला धमकी अन्...


नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी मुलीला धमकावलं. मात्र मुलगी लग्न न करण्यावर ठाम होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुलीला आणि तिच्या भावाला ताब्यात घेऊ नये असं सांगितलं. मात्र लग्न मंडपात गोंधळ घालणाऱ्या नवऱ्याला पोलीस घेऊन गेले.